Categories: जनाबाई

स्मरतांचि पावसी – संत जनाबाई अभंग – २९२

स्मरतांचि पावसी – संत जनाबाई अभंग – २९२


स्मरतांचि पावसी ।
तरी भक्तांसी लाधसी ॥१॥
ऐसा नाहीं न घडे देवा ।
वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस ।
मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठें चक्रपाणी ।
तुज आधीं लाही जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्मरतांचि पावसी – संत जनाबाई अभंग – २९२