ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥ अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥ जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति ॥३॥ तेथें कौचे बा धरिसी । ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥