जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥ राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥ देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥ जनी ह्मणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥