Categories: जनाबाई

अरे विठया विठया – संत जनाबाई अभंग – २८९

अरे विठया विठया – संत जनाबाई अभंग – २८९


अरे विठया विठया ।
मूळ मायेच्या कारटया ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली ।
जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझें गेलें मढें ।
तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनि आंगणीं ।
शिव्या देत दासी जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अरे विठया विठया – संत जनाबाई अभंग – २८९