पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥ भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥ उदार चक्रवर्ती बाप पंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥