भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥ भलें घालूनियां कोडें । परब्रह्म दारापुढें ॥२॥ घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥ जनी ह्मणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥