Categories: जनाबाई

पुंडलिक भक्तबळी – संत जनाबाई अभंग – २८६

पुंडलिक भक्तबळी – संत जनाबाई अभंग – २८६


पुंडलिक भक्तबळी ।
विठो आणिल भूतळीं ॥१॥
अनंत अवतार केवळ ।
उभा विटेवरी सकळ ॥२॥
वसुदेवा न कळे पार ।
नाम्यासवें जेवी फार ॥३॥
भक्त भावार्था विकला ।
दासी जनीला आनंद झाला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुंडलिक भक्तबळी – संत जनाबाई अभंग – २८६