हरिहर ब्रह्मादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥ ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥ जपें तपें लाजविलीं । तीर्थे शरणागत आलीं ॥३॥ नामदेवा कीर्तनीं । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥ देव श्रुतीं देती ग्वाही । जनी ह्मणे सांगूं कायी ॥५॥