येऊं ऐसें जाऊं । जनासंगें हेंचि दाऊं ॥१॥ आपण करुं हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥ नाम संशयछेदन । भवपाशाचें मोचन ॥३॥ जनी ह्मणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥