येऊं ऐसें जाऊं – संत जनाबाई अभंग – २८३
येऊं ऐसें जाऊं ।
जनासंगें हेंचि दाऊं ॥१॥
आपण करुं हरिकीर्तन ।
जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
नाम संशयछेदन ।
भवपाशाचें मोचन ॥३॥
जनी ह्मणे हो देवासी ।
होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥
येऊं ऐसें जाऊं ।
जनासंगें हेंचि दाऊं ॥१॥
आपण करुं हरिकीर्तन ।
जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
नाम संशयछेदन ।
भवपाशाचें मोचन ॥३॥
जनी ह्मणे हो देवासी ।
होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥