Categories: जनाबाई

नाम विठोबाचें घ्यावें – संत जनाबाई अभंग – २७८

नाम विठोबाचें घ्यावें – संत जनाबाई अभंग – २७८


नाम विठोबाचें घ्यावें ।
मग पाउल टाकावें ॥१॥
नाम तारक हें थोर ।
नामें तारिले अपार ॥२॥
आजामेळ उद्धरिला ।
चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाम विठोबाचें घ्यावें – संत जनाबाई अभंग – २७८