तो हा भक्तांचे तोडरीं – संत जनाबाई अभंग – २७७
तो हा भक्तांचे तोडरीं ।
वाचे उच्चारितां हरी ॥१॥
काम होऊनि निष्काम ।
काम भावभक्ति प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय ।
अखंडित नाम गाय ॥३॥
काम निष्काम झाला मनीं ।
वंदी नाचे दासी जनी ॥४॥
तो हा भक्तांचे तोडरीं ।
वाचे उच्चारितां हरी ॥१॥
काम होऊनि निष्काम ।
काम भावभक्ति प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय ।
अखंडित नाम गाय ॥३॥
काम निष्काम झाला मनीं ।
वंदी नाचे दासी जनी ॥४॥