विठ्ठल नामाची नाहीं – संत जनाबाई अभंग – २७६
विठ्ठल नामाची नाहीं गोडी ।
काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळां बांधोनि खांबासी ।
विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
ऐसा अभिमानी मेला ।
नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना ।
दासी जनी लागे चरणा ॥४॥
विठ्ठल नामाची नाहीं गोडी ।
काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळां बांधोनि खांबासी ।
विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
ऐसा अभिमानी मेला ।
नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना ।
दासी जनी लागे चरणा ॥४॥