जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥ वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥ ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥ नाम तारक त्रिभुवनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥