नाम फुकट चोखट । नाम घेतां नये वीट ॥१॥ जड शिळा ज्या सागरीं । आत्मारामें नामें तारी ॥२॥ पुत्रभावें स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें ॥३॥ नाममहिमा जनी जाणे । ध्यातां विठ्ठलचि होणें ॥४॥