गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥ सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥ आठवितां पाय त्याचे। मग तुह्यां भय कैंचें ॥३॥ कायावाचामनें भाव । जनी ह्मणे गावा देव ॥४॥