बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

माझा हा विठोबा येईल – संत जनाबाई अभंग – २६७

माझा हा विठोबा येईल – संत जनाबाई अभंग – २६७


माझा हा विठोबा येईल गे केव्हां ।
जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाउनी राउळा तयासी तूं पाहें ।
लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे ।
लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वराघरीं असेल बैसला ।
जाउनी विठ्‌ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा ।
खोळंबला नामा भोजनासी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझा हा विठोबा येईल – संत जनाबाई अभंग – २६७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *