शेष बाणातें पुसत । कोणे काजा आला येथ ॥१॥ बाण करी अहाकार । मुखें पडलीया धूर ॥२॥ वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसें येथें झालें देखा ॥३॥ काय शिखंडीचे बाण । करिती भीष्माचें पतन ॥४॥ तेथें मागितलें पाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥