खंडेराया तुज करितें नवसू ।
मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा ।
मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद ।
मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद सरतां होईन मोकळी ।
गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे ।
एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥
View Comments
मी पणाची सासू मरू दे, म अहंकार नावाचा सासऱ्याच्या आसरा जाईन मग अहंकार नावाचं सासरा आपोआप मरेन, वासना नावाची नणंद मरूदे, मग शुद्ध अंतःकरनातं भक्तीची झोळी घेईन आणि मी भगवताच्या चारणावर एकटीच राहीन