जो जो जो जो रे – संत जनाबाई अभंग – २५८
जो जो जो जो रे गोरक्षा ।
जगदोद्धारा जगदीशा ॥१॥
शुद्ध सुमनांची सेज ।
भक्तिभावें आंत नीज ॥२॥
माता उन्मनी केवळ ।
निजीं निजले गोपाळ ॥३॥
मागें घालुनी आनंदा ।
सुखें निजे बा गोविंदा ॥४॥
अद्वय नाम गीतीं गातां ।
दासी जनी कैंची आतां ॥५॥