Categories: जनाबाई

ऐसा योग घडे ज्यातें – संत जनाबाई अभंग – २५३

ऐसा योग घडे ज्यातें – संत जनाबाई अभंग – २५३

ऐसा योग घडे ज्यातें ।
धन्य माता आणि तात ॥१॥
अखंड वासना ।
ब्रम्हार्पण देवार्चना ॥२॥
ब्रम्हभावें हो देवा ।
ऐसा पूजी जो भूदेवा ॥३॥
नम्रता चरणीं ।
म्हणे जनी सरली मनीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसा योग घडे ज्यातें – संत जनाबाई अभंग – २५३