बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

जनी म्हणे पांडुरंगा – संत जनाबाई अभंग – २५

जनी म्हणे पांडुरंगा – संत जनाबाई अभंग – २५जनी म्हणे पांडुरंगा ।


माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा ।
महिमा साधुसंतांची ॥१॥
कैसी वसविली पंढरी ।
काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं ।
कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद ।
कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा ।
सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा ।
दासी जनी विनवितसे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जनी म्हणे पांडुरंगा – संत जनाबाई अभंग – २५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *