येरीकडे गंगातीरीं । कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥ र्मासहित साहीजण । ऋषिलागीं देती अन्न ॥२॥ रत्नखचित मंडपा आंत । पंगती बैसल्या आनंदभूत ॥३॥ नानापरिचें दिव्य अन्न । वाढी द्रौपदी आपण ॥४॥ मिठी पडली वदनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥