रत्नाचे मचकीं पहुडे चक्रपाणी । चोळीत रुक्मिणी चरणांबुज ॥१॥ कानीं पडियले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीनें ॥२॥ रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्ट । पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥ टाकिला गरुड अनवाणी पाय । जनी म्हणे माय धांविन्नली ॥४॥