Categories: जनाबाई

वेष धरोनी ब्राम्हण – संत जनाबाई अभंग – २३९

वेष धरोनी ब्राम्हण – संत जनाबाई अभंग – २३९


वेष धरोनी ब्राम्हण ।
तिसी करी संभाषण ॥१॥
खेद न करीं मानसीं ।
काय करणें होणारासी ॥२॥
वेगीं संस्कारीं याला ।
दिवसा मागतीं जा कामाला ॥३॥
घेऊनियां प्रेतासी ।
वेगीं चेतवी अग्नीसी ॥४॥
ज्वाळा अवलोकितां नयनीं ।
राव आला तत्‌क्षणीं ॥५॥
म्हणे कोण गे तूं येथें ।
येरी म्हणे तुमचा सुत ॥६॥
कैचा सुत कैसा काय ।
आमचा हक कोठें आहे ॥७॥
करुणा ग्लानी करी त्याची ।
म्हणे गोष्‍ट हे तों कैंची ॥८॥
बरेपणें जांई आतां ।
दंड बैसतलि माथां ॥९॥
घेंई प्रेत ओसंगळी ।
वेगें प्रवेशे देउळीं ॥१०॥
आडवें प्रेत झोपीं जाय ।
ऋषि धांवे लवलाहे ॥११॥
उदर चिरोनियां नखीं ।
मांस कवळें घाली मुखीं ॥१२॥
येऊनियां नगरनारी ।
जनी म्हणे शंख करी ॥१३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वेष धरोनी ब्राम्हण – संत जनाबाई अभंग – २३९