पंथ क्रमितां तिघांसी – संत जनाबाई अभंग – २३०
पंथ क्रमितां तिघांसी ।
आडवा आला कपटवेषी ॥१॥
होवोनियां वृद्ध विप्र ।
हातीं काठी भार्याकुमर ॥२॥
म्हणे धन्यरे नृपेशा ।
तुझी कीर्तिघोष ठसा ॥३॥
भेरी गर्जती त्रिभुवनीं ।
धांवून आलों मी ऐकुनी ॥४॥
आज्ञा करावी जी स्वामी ।
तुमचे शरणागत आम्ही ॥५॥
करुणा दाखवी रायासी ।
दीन आम्ही तीर्थवासी ॥६॥
पुढें प्रवास कठीण ।
पायीं नाहीं पायतण ॥७॥
तिघां बोपोनियां जोडे ।
जनी म्हणे जाती पुढें ॥८॥