अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ॥१॥ करी त्रैलोक्य भ्रमणा । करीं वाहे ब्रम्हवीणा ॥२॥ देती सर्वही सन्मान । सिद्ध साधू योगी जन ॥३॥ सांगे अपूर्व काहाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥