बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

ऐका हो नामयाचा जन्म – संत जनाबाई अभंग – २१८

ऐका हो नामयाचा जन्म – संत जनाबाई अभंग – २१८


ऐका हो नामयाचा जन्म मूळसंचित ॥धृ०॥
हिरण्यकश्यपकुळीं नामा प्रर्‍हाद ।
पद्मीणी नाम माझें श्रेष्‍ठ दासीचें पद ॥१॥
दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त ।
मंथरा नाम माझें भरतें मारिली लात ॥२॥
द्वापारीं कृष्णसेवा उद्धव जन्मला ।
कुबज्या नाम माझें देवें उद्धार केला ॥३॥
कलींत नामदेव विठ्‌ठल चिंतनीं ।
त्याचीच सेवेलागीं दासीं जन्मली जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐका हो नामयाचा जन्म – संत जनाबाई अभंग – २१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *