नमुनी ब्राम्हण । म्हणे मज द्यावें अन्न ॥१॥ नामा म्हणे एकादशी । इच्छित द्यावें फराळासी ॥२॥ अन्नावांचोनी आतां । मज नकोरे सर्वथा ॥३॥ हातापायांची बेगडी । विप्रें घातली मुरकुंडी ॥४॥ जीव सोडी चक्रपाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥