करुनी आरती । नामा आला घराप्रती ॥१॥ तेणें धरियेलें व्रता । अन्न न घ्यावें सर्वथा ॥२॥ ऐसा जाणोनिया नेम । अनुभवी पुरुषोत्तम ॥३॥ आषाढी एकादशी । विप्रवेषें ह्रुषिकेशी ॥४॥ आला नामयाचे सदनीं । नाम गाय दासी जनी ॥५॥