करुनी आरती – संत जनाबाई अभंग – २१४
करुनी आरती ।
नामा आला घराप्रती ॥१॥
तेणें धरियेलें व्रता ।
अन्न न घ्यावें सर्वथा ॥२॥
ऐसा जाणोनिया नेम ।
अनुभवी पुरुषोत्तम ॥३॥
आषाढी एकादशी ।
विप्रवेषें ह्रुषिकेशी ॥४॥
आला नामयाचे सदनीं ।
नाम गाय दासी जनी ॥५॥