आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥१॥ देवें गरुड धाडिला । वेगीं बालाविलें त्याला ॥२॥ राही म्हणे पांडुरंगा । कोणें बोलाविलें सांगा ॥३॥ ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥४॥