Categories: जनाबाई

द्रौपदीकारण – संत जनाबाई अभंग – २१

द्रौपदीकारण – संत जनाबाई अभंग – २१


द्रौपदीकारण ।
पाठीराखा नारायण ॥१॥
गोरा कुंभाराच्यासंगें ।
चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
कबिराच्या बैसोनि पाठीं ।
शेले विणितां सांगे गोष्‍टी ॥३॥
चोखामेळ्यासाठीं ढोरें ओढी जगजेठी ॥४॥
जनीसंगें दळूं लागे ।
सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

द्रौपदीकारण – संत जनाबाई अभंग – २१