Categories: जनाबाई

वोढिला ताडिला – संत जनाबाई अभंग – २०९

वोढिला ताडिला – संत जनाबाई अभंग – २०९


वोढिला ताडिला ।
देव भक्तीनें फाडिला ॥१॥
एका प्रेमा नामासाठीं ।
भक्ति काढियला कंठीं ॥२॥
झाला नाम्याचा मजूर ।
मोळ्या बांधाटयाचा थर ॥३॥
भिंती चांदया रचिले ।
त्याचें छप्पर शेकारिलें ॥४॥
वरी सोडूनियां पाणी ।
धन्य भक्‍ता म्हणे जनी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वोढिला ताडिला – संत जनाबाई अभंग – २०९