पूर आला पंढरीसी । पाणी लागे पायरीसी ॥१॥ संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥ नामा सांगे विठोबासी । उतार द्यावा भिवरेसी ॥३॥ दीनवत्सल महाराज । जनी म्हणे केलें काज ॥४॥