पूर आला पंढरीसी – संत जनाबाई अभंग – २०७
पूर आला पंढरीसी ।
पाणी लागे पायरीसी ॥१॥
संतजन हो मिळाले ।
उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥
नामा सांगे विठोबासी ।
उतार द्यावा भिवरेसी ॥३॥
दीनवत्सल महाराज ।
जनी म्हणे केलें काज ॥४॥
पूर आला पंढरीसी ।
पाणी लागे पायरीसी ॥१॥
संतजन हो मिळाले ।
उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥
नामा सांगे विठोबासी ।
उतार द्यावा भिवरेसी ॥३॥
दीनवत्सल महाराज ।
जनी म्हणे केलें काज ॥४॥