सुंबाचा करदोडा रकटयाची लंगोटी । नामा वाळवंटीं कथा करी ॥१॥ ब्रम्हादिक देव येवोनि पाहाती । आनंदें गर्जती जयजयकार ॥२॥ जनी म्हणे त्याचें काय वर्णूं सुख । पहाती जे मुख विठोबाचें ॥३॥