गोणाईने नवस केला – संत जनाबाई अभंग – २०२
गोणाईने नवस केला ।
देवा पुत्र देंई मला ॥१॥
ऐसा पुत्र देंई भक्त ।
ज्याला आवडे पंढरीनाथ ॥२॥
शुद्ध देखोनियां भाव ।
पोटा आले नामदेव ॥३॥
दामाशेटी हरुषला ।
दासी जनीनें ओवाळिला ॥४॥
गोणाईने नवस केला ।
देवा पुत्र देंई मला ॥१॥
ऐसा पुत्र देंई भक्त ।
ज्याला आवडे पंढरीनाथ ॥२॥
शुद्ध देखोनियां भाव ।
पोटा आले नामदेव ॥३॥
दामाशेटी हरुषला ।
दासी जनीनें ओवाळिला ॥४॥