बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

सेना न्हावी भक्त भला – संत जनाबाई अभंग – २०१

सेना न्हावी भक्त भला – संत जनाबाई अभंग – २०१


सेना न्हावी भक्त भला ।
तेणें देव भुलविला ॥१॥
नित्य जपे नामावळी ।
लावी विठ्‌ठलाची टाळी ॥२॥
रुप पालटोनि गेला ।
सेना न्हावी विठ्‌ठल झाला ॥३॥
काखें घेउनी धोकटी ।
गेला राजियाचे भेटी ॥४॥
आपुले हातें भार घाली ।
राजियाची सेवा केली ॥५॥
विसर तो पडला रामा ।
काय करूं मेघःशामा ॥६॥
राजा अयनियांत पाहे ।
चतुर्भुज उभा राहे ॥७॥
दूत धाडूनियां नेला ।
राजियानें बोलाविला ॥८॥
राजा बोले प्रीतिकर ।
रात्रीं सेवा केली फार ॥९॥
राजसदनाप्रति न्यावें ।
भीतरींच घेउनी जावें ॥१०॥
आतां बरा विचार नाहीं ।
सेना म्हणे करुं काई ॥११॥
सेना न्हावी गौरविला ।
राजियानें मान दिला ॥१२॥
कितीकांचा शीण गेला ।
जनी म्हणे न्हावी झाला ॥१३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सेना न्हावी भक्त भला – संत जनाबाई अभंग – २०१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *