शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥ त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत ॥२॥ नव्वाण्णवाच्या सालीं मुक्ताई देखिली । जनी म्हणे केली मात त्यांनीं ॥३॥