संत राउळा चालिले – संत जनाबाई अभंग – १९४
संत राउळा चालिले ।
ज्ञानेश्वर तंव बोले ॥१॥
एवढें नवल सांगावें ।
दासी जनीचें पद ल्याहावें ॥२॥
पाय जोडुनी विटेवरी ।
कटीं हात उभा हरी ॥३॥
रुप सांवळें सुंदर ।
कानीं कुंडल मनोहर ॥४॥
सोनसळा वैजयंती ।
पुढें गोपाळ नाचती ॥५॥
गरुडपारीं सन्मुख उभा ।
जनी म्हणे धन्य शोभा ॥६॥