मायेहूनि माय मानी । करी जिवाची ओंवाळणी ॥१॥ परलोकींचें तारूं । म्हणे माझा ज्ञानेश्वरु ॥२॥ वित्त गोत चित्त पाहे । सत्य वंदी गुरुचे पाय ॥३॥ पतिव्रते जैसा पती । जनी म्हणे सांगों किती ॥४॥