वैकुंठीचा हरी । तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥ रांगतसे हा अंगणीं । माथा जावळाची वेणी ॥२॥ पायीं पैंजण आणि वाळे । हातीं नवनीताचे गोळे ॥३॥ धन्य यशोदा ते माय । दासी जनी वंदी पाय ॥४॥