वैकुंठीचा हरी – संत जनाबाई अभंग – १८५
वैकुंठीचा हरी ।
तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
रांगतसे हा अंगणीं ।
माथा जावळाची वेणी ॥२॥
पायीं पैंजण आणि वाळे ।
हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा ते माय ।
दासी जनी वंदी पाय ॥४॥
वैकुंठीचा हरी ।
तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
रांगतसे हा अंगणीं ।
माथा जावळाची वेणी ॥२॥
पायीं पैंजण आणि वाळे ।
हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा ते माय ।
दासी जनी वंदी पाय ॥४॥