शूराचें तें शस्त्र कृपणाचें – संत जनाबाई अभंग – १७८
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन ।
विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥
गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान ।
गेलियाही प्राण हातां नये ॥२॥
सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन ।
गेलियाही प्राण हातां नये ॥३॥
विराल्यावांचून देह अहंभाव ।
जनी म्हणे देव हातां नये ॥४॥