नाना व्रत तप दान । मुखीं हरी स्मरण ॥१॥ येथें असों द्यावा भाव । पुरवी अंतरींचें देव ॥२॥ हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ॥३॥ भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यासी धांवतो सामोरा ॥४॥ लक्ष लावा पायांपाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥