नाना व्रत तप दान – संत जनाबाई अभंग – १७७
नाना व्रत तप दान ।
मुखीं हरी स्मरण ॥१॥
येथें असों द्यावा भाव ।
पुरवी अंतरींचें देव ॥२॥
हाचि विश्वास धरुनी ।
कृपा करील चक्रपाणी ॥३॥
भक्तिभाव ज्याचा पुरा ।
त्यासी धांवतो सामोरा ॥४॥
लक्ष लावा पायांपाशीं ।
म्हणे नामयाची दासी ॥५॥