विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥१॥ तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥२॥ मरोनियां जावें । शरण विठोबासी व्हावें ॥३॥ म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥४॥