विवेकाची पेंठ – संत जनाबाई अभंग – १७५
विवेकाची पेंठ ।
उघडी पंढरीची वाट ॥१॥
तेथें नाहीं कांहीं धोका ।
उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें ।
शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी ।
देव करा ऐसा ऋणी ॥४॥
विवेकाची पेंठ ।
उघडी पंढरीची वाट ॥१॥
तेथें नाहीं कांहीं धोका ।
उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें ।
शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी ।
देव करा ऐसा ऋणी ॥४॥