येऊनियां जन्मा एक । करा देहाचें सार्थक ॥१॥ वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ॥२॥ ऐसा नामाचा महिमा । शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥ नाम शास्त्रीं त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥